लोहारा/प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दि.15 ऑगस्ट 2022 रोजी लोहारा पंचायत समितीला महा आवास जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्कार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते गटविकास अधिकारी श्रीमती शितल खिंडे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

20 नोव्हेंबर 2021 ते 10 जुन 2022 या कालावधीत महा आवास योजना राबविण्यात आली होती. या अभियानात सहभाग घेऊन केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना लोहारा पं.स.ने ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवुन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.लोहारा तालुक्यातील आष्टा कासार ग्रामपंचायतला तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार ग्रामपंचायत आष्टा कासार,जेवळी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट क्लस्टर तालुका प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करुन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेघावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल गुप्ता मुख्य पोलीस अधिक्षक कुलकर्णी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती प्रांजल शिंदे,अदि, मान्यवर उपस्थित होते. लोहारा पं.स.चे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top