तुळजापूर/ प्रतिनिधी-
येथील सोनाली पाठक यांनी राज्यस्तरीय शक्तीतोलन (पॉवरलिफ्टिंग) अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावुन,राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
विदर्भ पावर लिफ्टिंग असोसिएशन नागपूर, रोटरी क्लब अमरावती व जिल्हा अमरावती पावर लिफ्टिंग असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सबजिनीयर, जुनियर, सीनियर व मास्टर्स या चार प्रकारात राज्यस्तरीय शक्तीतोलन (पॉवरलिफ्टिंग) अजिंक्यपद स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये मास्टर्स (४०+) या महिलांच्या गटात सौ.सोनाली पाठक यांनी सुवर्णपदक पटकावले असून त्यांनी राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांचे या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, त्यांना सौ.अर्चना नाडार यांनी प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले. सौ.सोनाली पाठक या तुळजापूर येथील रहिवासी असून, त्या सेवानिवृत्त मुख्याध्यापीका सौ.शशिकला विद्याधर पाठक यांच्या सुश्ना आहेत.