तुळजापूर/ प्रतिनिधी-

अवैधरित्या हातभट्टी दारु वाहतुक होत असल्याची माहीती  दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना मिळताच सोलापूर - तुळजापूर रोडवर माळुंब्रा शिवारात   अवैधरित्या  हातभट्टी दारु वाहुन नेणारी तेवरा पकडुन   दारु व तवेरासह एकूण  .२,८०,००० / - किंमतीचा मुद्देमाल   जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई  मंगळवार दि. ९रोजी सकाळी करण्यात आली.सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीस ०२ दिवसाची पोलिस ( एक्साईज ) कस्टडी सुनावली आहे .

कारवाई दरम्यान  आरोपी   मिथुन हरिबा चव्हाण व  सुरेश शंकर राठोड  (रा.मुळेगाव तांडा ता.द. सोलापूर जि सोलापूर ) यांचेकडून एक चार चाकी वाहन  तवेरा अंदाजे किंमत रु .२,२५,००० / - व १०० लीटर क्षमतेच्या ११ रबरी ट्युबमध्ये एकूण ११०० लिटर  गावठी   दारु अंदाजे किंमत रु .५५,००० / - असे एकूण रु .२,८०,००० / - किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी विरुद्ध  गुन्हा नोंद करून सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपीस ०२ दिवसाची पोलिस ( एक्साईज ) कस्टडी सुनावली आहे.


 
Top