उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद पोस्ट ऑफिस मध्ये फाळणीचे दू:ख विषद करणारी माहिती व फोटो यांचे संकलन असणारे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र सैनिक भास्कर नायगावकर यांच्या हस्ते फीत कापून झाले. या वेळी स्वातंत्र्य सैनिक मेहबूब पठाण यांची विशेष उपस्थिती होती.

उस्मानाबाद पोस्ट ऑफिसने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचाच भाग म्हणून फाळणीचे दू: ख पुन्हा एकदा स्पष्ट करणारे फोटो आणि माहितीचे प्रदर्शन पोस्ट ऑफिसच्या पब्लिक हॉल मध्ये केले आहे. स्वातंत्र मिळाल्याचा आनंद साजरा करतानाच फाळणीचे विदारक चित्र प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. याच आठवणी जाग्या करताना मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे . याची मांडणी या प्रदर्शनाद्वारे केली आहे. या कार्यक्रमासाठी पोस्टमास्तर यस. एन. कुडले, संदीप कुलकर्णी, व्ही. व्ही. गोवर्धन तसेच सर्व पोस्टल स्टाफ उपस्थित होता. या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन पोस्टमास्तर उस्मानाबाद यांनी केले आहे. हे प्रदर्शन १४ ऑगस्ट पर्यन्त पोस्ट ऑफिस मध्ये असणार आहे.

 
Top