उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आम आदमी पार्टीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी राहुल माकोडे यांची निवड झाली. औरंगाबादेत बैठकीत पार्टीचे राज्य निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते माकोडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, राज्य कमिटी सदस्य अॅड.अजित खोत, युवक प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे, मराठवाडा सचिव नितीन ढवळे, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, जिल्हा मिडिया प्रमुख प्रा. चांद शेख, नूतन उस्मानाबाद तालुकाध्यक्ष राजपाल देशमुख, तुळजापूर तालुकाध्यक्ष मधुकर शेळके, नळदुर्ग शहराध्यक्ष वसीम शेख, उस्मानाबाद शहर सचिव नामदेव वाघमारे, कृपालसिंह ठाकूर, मोहसिन मिर्झा, जगदीश राठोड, अजहर शेख, मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top