लोहारा / प्रतिनिधी

लोहारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी एका पोलिसांनी २५ हजार रुपये ची मागणी केली.तडजोडी अंती  २० हजार रुपये ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक च्या जाळ्यात सापडला.

          याबाबत संबंधित तक्रारदार यांच्यावर लोहारा पोलीस ठाण्यात एका प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता.त्या गुन्हे संदर्भात लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत  पोलीस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे यांनी गुन्हा दाखल झालेल्या कडे अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी २५ हजार रुपये ची मागणी केली होती.याप्रकरणी २० हजार रुपये वर तडजोड झाली.   जेवळी-माकणी रोडवरील पेट्रोल पंप समोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गोरोबा बाबासाहेब इंगळे यांना २९ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

     लाच लुचपत प्रतिबंध औरंगाबाद विभाग पोलीस अधीक्षक राहुल खाडे,अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंध विभाग उस्मानाबाद पथकाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते,पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख,दिनकर उगलमूगले,विष्णू बेळे,जाकेर काझी यांनी सापळा रचून ही कारवाई केली.


 
Top