तेर /प्रतिनिधी-

स्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह पूर्ववत चालू करण्याची मागणी तेर येथील राहूल गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह बांधलेले आहे. परंतू अनेक वर्षांपासून ते बंद आहे.त्यामुळे तेरमध्ये येणाऱ्या पर्यटक व भक्तगण यांची गैरसोय होत आहे.तरी पाटबंधारे विभागाच्या तेर येथील विश्रामगृह दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करून तेर येथील पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह पूर्ववत चालू करण्याची मागणी तेर येथील राहूल गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यकडे निवेदनाद्वारे केली आहे.याची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविली आहे.


 
Top