नळदुर्ग / प्रतिनिधी-

नळदुर्ग येथील प्राचिन व ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा नर-मादी धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाला आहे. त्यामुळे आता पर्यटकांची किल्ल्यात गर्दी होणार आहे.

      सध्या नळदुर्ग शहर व परीसरात गेल्या कांही दिवसांपासुन दमदार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर बोरीधरण क्षेत्रातही मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने  बोरी धरण पुर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले होते. धरणाचा सांडवा सुरू झाल्याने सांडव्यातुन येणारे पाणी पुढे बोरी नदीत जात आहे याचा परीणाम म्हणुन दि.४ ऑगस्ट रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील डोळे दिपवुन टाकणारा नर--मादी तसेच शिलक धबधबा ओसंडुन वाहण्यास सुरुवात झाले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी हे धबधबे ओसंडुन वाहत आहेत. मात्र गेली दोन वर्षे धबधबे सुरू होऊनही कोरोनामुळे ते पर्यटकांना पाहता आले नव्हते कारण कोरोनामुळे किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र यावर्षी हा नेत्रदीपक क्षण पर्यटकांना पाहता येणार आहे.

 
Top