उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मांडवा गावात भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात आला.  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याचा पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत  राहाव्यात म्हणून राज्यात हा कार्यक्रम आहे.  मांडवा ग्रामपंचायात कार्यालयामार्फत गावातील जेष्ठ स्वतंत्रसैनिक तथा उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे पाहिले कृषी सभापती  लक्षमणराव देशमुख आणि सरपंच डॉ सौ योगिनी देशमुख यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे  वाटप करण्यात आले.

 गावातील कार्यरत महिला  बचत गट,आशा कार्यकर्त्या,आंगणवाडी सेविका यांच्या मार्फत प्रत्येकाच्या घरी जाऊन तिरंगा ध्वज आणि त्याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. दि 13 ते 15 ऑगस्ट  रोजी सर्वानी आपल्या घरी ध्वज लावा असे आवाहन सरपंचांनी केले. यावेळी सर्वश्री मिटू देशमुख,संजय देशमुख,संजय गरड,विलास माळी, श्रीरंग सुतार,अरुण पाटील,गिरी ग्रामसेवक ,गोरख यादव,लिंबराज निकम,अंगणवाडी सेविका,बचतगट कार्यकर्त्या,आशा वर्कर आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

 
Top