परंडा/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील आलेश्वर येथील गायक सोहिल मुलाणी यांचा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुर नवा ध्यास नवा, पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे हे कार्यक्रम त्यांनी गाजविले. भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सुबोधसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, बिभीषण हांगे, फारूख मुलानी, सारंग घोगरे, अजित पाटील आदीसह सहकारी उपस्थित होते. तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनीही त्याचा सत्कार केला .


 
Top