लोहारा/प्रतिनिधी

  “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवण्यात यावा, या उपक्रमांची माहिती होण्यासाठी शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेस जनजागृती करुन विविध स्पार्धाचे व इतर उपक्रामाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन आ.ज्ञानराज चौगुले केले.

दरम्यान लोहारा तहसील कार्यालयात दि.8 ऑगस्ट 2022 रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अमृत महोत्सवाचा लोगो असलेले बॅचेसचे अनावरन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीस तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, पोलिस निरीक्षक सुनिलकुमार काकडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, सा.बा.वि. उपअभियंता घोडके, शाखा अभियंता राजेंद्र माळी, महावितरणचें उपअभियंता शिवाजी रेड्डी, शाखा अभियंता राम दिक्षित, मोहन पणुरे, जगन्नाथ पाटील, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरपंचायतचे अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, परवेज तांबोळी, नगरसेवक अमीन सुंबेकर, जालिंदर कोकणे, कमलाकर सिरसाट, प्रताप लोभे, यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top