उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पीकांचे ‘सततचा पाउस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता तात्काळ पंचनामे करावे आणि एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही ही दक्षता घ्यावी, अशा सुचना धाराशीव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या आहेत. 

खासदारओमराजे यांनी लोहारा तालूक्यातील मार्डी, बेंडकाळ, लोहारा खुर्द, माकणी, सास्तुर, कोंडजीगड, मुरशदपूर व खेड यांसह तालूक्यातील सततच्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या गावांतील पाहणी केली . या दौऱ्यावेळी प्रशासनाला सूचना दिल्या. याप्रसंगी जि. प. सदस्य दीपक भैय्या जवळगे, नामदेव मामा लोभे, अमोल बिराजदार, ज्ञानेश्वर तात्या सुरवसे, माने, तहसीलदार रुईकर, तालुका कृषी अधिकारी बीडभाग, गट विकास अधिकारी पाटील व यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 
Top