लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विमा प्रतिनिधी सचिन सोनकटले यांच्या प्रयत्नातून अचलेर गावास बिमा ग्राम पुरस्कार मिळाले. सोनकटले यांनी सामाजिक भावना जपत बिमा ग्राम पुरस्कारातुन येथील सर्व जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पो.नि.आर.एम.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टा केंद्राचे केंद्रप्रमुख आर.एस.चव्हाण होते.तर प्रमुख म्हणून सरपंच प्रकाश लोखंडे,यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक नायकल,ग्रामसेवक एम.के.बनशेट्टी, मुख्याध्यापक खंडागळे, मुख्याध्यापक बलसुरे,मंडळ कृषी अधिकारी रवी बनजगोळे, कृषी सहायक चिदानंद स्वामी, सचिन सोनकटले, संतोष सोलंकर, जगदीश सुरवसे, मल्लिनाथ अष्टगे, लखन चव्हाण, तम्मा सोनकटले,आदी माण्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी सहायक पोलिस निरिक्षक आर एम जगताप, सरपंच प्रकाश लोखंडे मुख्याध्यापक कृष्णा खंडागळे ,केंद्रप्रमुख आर एस चव्हाण,यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष सोलंकर यांची निवड झाल्याबदद्ल त्यांचे अभिनंदन व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.व तसेच *सचिन सोनकटले व सोनालीताई सोनकटले या पति-पत्नि यांचा उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अचलेर गावास विमा पुरस्कार व शैक्षणिक व क्रीडा साहित्य मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सोनकटले व सूत्रसंचलन जगदीश सुरवसे  यांनी केले तर आभार  प्रदर्शन अतुल बाबळे यांनी मानले.या कार्यक्रमास सौ.सविता पूजारी, सौ.वैशाली सोलंकर , सौ.शारदा सोनकटले, सौ.सुमन ठेंगील,सावरे सुरेखा,सौ. अमृता सोनकटले,सौ.जामगे सुकुमार,सौ.अनिता सोनकटले, सौ.बिसमिल्ला मुल्ला,मुन्नाबी शेख,सौ. मंडाबाई सोनकटले, सौ.काशिबाई ठेंगील,जयबुन जमादार,सौ. ऐश्वर्या घोडके,सौ.चंद्रकला सोनकटले,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top