परंडा / प्रतिनिधी :-

तालुका शिक्षक पुरस्कार प्रस्ताव मागणीसाठी लेखी पत्र काढून जाहीर आवाहन करावे तसेच हितसंबंधांना थारा न देता पारदर्शीपणे निकष पात्र शिक्षकांची तालुका शिक्षक पुरस्कारासाठी निवड करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे गट शिक्षणाधिकारी अशोक खुळे यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदनावर प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, उपाध्यक्ष शहाजी झगडे आदि.पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top