नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात नळदुर्ग येथील युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांच्या नेतृत्वाखाली   तुळजापुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात नळदुर्ग शहरांतील ७५ युवकांनी जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे नळदुर्गच्या राजकारणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

 दरम्यान ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह मनसेचे माजी शहर प्रमुख शिवाजी सुरवसे, सुनिल गव्हाणे,माजी नगरसेवक बुद्धप्पा लिंबोळे, निखिल घोडके, बंटी जाधव, किसन गायकवाड, गजानन हळदे, शशिकांत जाधव, मनोज मिश्रा, अनिकेत वाघमोडे, प्रतीक वाघमोडे, शंकर वाघमारे, शाम काळे, बबलु सुरवसे, सुनिल नितळे, अभिषेक सापळे, निखिल नितळे, गणेश सोनटक्के,सुमित व्हगाडे,राहुल घोडके, सचिन शिंदे, बाबा घोडके,रोहित माने, संतोष शिंदे, अविनाश बलसुरे,बबलु घोडके, सुनिल चव्हाण, किरण राठोड, आदी चव्हाण, अनिकेत डोळे, लक्ष्मण शेंडगे, राम कामटे, सागर राठोड,राहुल चव्हाण, अभि गाडगे, राहुल राठोड, राहुल वसंत राठोड, किरण पवार, विष्णु चौधरी, सचिन दासमे, संभाजी पवार, राहुल सोमवंशी, आप्पू राठोड, विठ्ठल सोमवंशी व अमर गुड्डे आदींने शिंदे गटात प्रवेश केला  

     शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके,मोहन पनुरे, सुरज साळुंके व जि. प.चे माजी बांधकाम विभागाचे सभापती धनंजय सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.


 
Top