उस्मानाबाद / प्रतिनिधी-
लेडीज क्लब, धाराशिवच्या अध्यक्षा तथा जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून लेडीज क्लब यांच्या वतीने यावर्षी ‘गौरी - गणपती देखावा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील देखावा स्पर्धेत आकर्षक पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.१०,००१ /-, द्वितीय पारितोषिक रु. ७,००१/-, तृतीय पारितोषिक रु.५,००१/- तर उत्तेजनार्थ रु.१,००१/- चे तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी कार्यालय लेडीज क्लब, धाराशिव येथे दि०२ सप्टेंबर २०२२ पर्यंत संपर्क करून नोंदणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी सौ. पुनगुडे मॅडम- ९४२०२००५४९, श्रीमती जाधवर मॅडम- ९४०४६२३३५२, श्रीमती संगीता भोरे - ९८५०२६२९१६ यांच्याशी संपर्क करावा. परीक्षण गौरी - गणपती देखावा परीक्षण तारीख ३ व ४ सप्टेंबर २०२२ असून अंतिम निकाल दि.६ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी घेऊन आयोजकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.