उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वाशी पोलिस ठाण्याचे पथक ८ ऑगस्ट रोजी गस्तीवर असताना पारगाव बस स्थानकाजवळील शेडसमोर काही व्यक्ती जुगार खेळत असता पथकाने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पारगाव ग्रामस्थ राजेंद्र जाधव, संदिप कवडे, संतोष गव्हाणे, सुहास डोके, बाबासाहेब सुरवसे, विलास जाधव, अण्णा शिंदे, नितीन बनसोडे तिरट जुगार खेळत होते. पोलिस पथकास जुगार साहित्यासह दुचाकी, ५ मोबाइल व रोख, असा एकूण ८५,६६० रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन नमूद व्यक्तींविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनात वाशीचे पोलिस निरीक्षक दळवे यांच्या पथकाने केली.


 
Top