परंडा / प्रतिनिधी -

 शहरातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  हंसराज गणेश मंडळाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये मागील कार्यकारणी मधील पदाधिकारी यांची फेर निवड करण्यात आली आहे.

यामध्ये अध्यक्ष पदी अमित जोशी,उपाध्यक्ष शुभम भातलवंडे , खजिनदार  समर्थ कुळधर्मे ,सचिव अहमद मुजावर, सहसचिव अमोल भराटे यांची फेरनिवड करण्यात आली. या बैठकीत हंसराज स्वामी मठासमोर स्टेज व मंडप डेकोरेशन करून मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे एकमताने ठरले.

 या बैठकीमध्ये नितीन भोत्रेकर,ॲड.श्रीकांत भालेराव,डॉ.प्रशांत गोफणे, पञकार प्रमोद वेदपाठक, जयंत भातलवंडे, रोहीत मुगळीकर संदीप महामुनी, राहुल मुगळीकर, अमोल वांबुरकर, रोहीत भोत्रेकर, शंतनु भातलवंडे व मंडळाचे सदस्य आदी उपस्थीत होते.


 
Top