उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने भारत माता पुजन सर्व सामान्य देशवासी पांडुरंग राठोड , फळविक्रेता जावेद बागवान, खंडू राऊत यांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,राजसिंह राजे निंबाळकर, शहराध्यक्ष सुजीत साळुंके , प्रीतम मुंडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्कार भारती समिती जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासचिव प्रभाकर चोराखळीकर, कलाविष्कार अकादमी द्वारा संचलित मेलडी स्टार चे प्रवर्तक तथा संस्कार भारती सदस्य युवराज नळे ,शहर संयोजन समिती पत्रकार संघ अध्यक्ष चंद्रसेन देशमुख अध्यक्ष शरद वडगावकर , जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर , प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. भारत माता पुजनानंतर जिल्हा संस्कार भारती समिती व कलाविष्कार अकादमी द्वारा संचलित मेलडी स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम ध्येय गीत व संपूर्ण वंदे मातरम् गायनानंतर देश भक्तीपर बहारदार गीतांचे गायन तौफीक शेख , प्रगती शेरखाने, सुशील कुलकर्णी , महेश उंबर्गीकर , युवराज नळे , रवींद्र कुलकर्णी , शरद वडगावकर, शेषनाथ वाघ, श्याम सुंदर भन्साळी यांनी गायन केले . नितीन काळे, चंद्रसेन देशमुख ,मोहन कुलकर्णी,महेश वडगांवकर ,राजसिंह राजेनिंबाळकर पूर्णवेळ उपस्थित राहून गायनाचे श्रवण केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन बनसोडे, राजाभाऊ कारंडे, मोहन मुंडे , सुधीर पवार आदि सदस्यांनी परिश्रम घेतले सुत्र संचालन प्रभाकर चोराखळीकर, युवराज नळे यांनी केले तर धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले शहरातील बहुसंख्य देशवासी गायनाचा आनंद घेतला .