नळदुर्ग / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी सामुहीक राष्ट्रगीत गाण्यात आले. यावेळी शहरांतील नागरीकांनी आहे तिथुन सामुहिक राष्ट्रगीत गाऊन देशप्रेम व्यक्त केले.

      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसरकारने नागरीकांमध्ये देशप्रेम भावना जागृत व्हावी यासाठी दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामुहिक, वैयक्तिक किंवा जिथे असतील तेथुन नागरीकांनी राष्ट्रगीत गावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला ऐतिहासिक नळदुर्ग शहरात नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरांतील सर्व शाळा, महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय, पोलिस ठाणे, महामार्ग पोलिस, व नागरीकांनी आहे तिथुन राष्ट्रगीत गायले. नगरपालिकेत नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रगीत गायले. त्याचबरोबर बसस्थानकात देखील सकाळी अकरा वाजता प्रवाशी व नागरीकांनी सामुहिक राष्ट्रगीत गायले. यावेळी वाहतुक नियंत्रक महेश डुकरे, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे,भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, पत्रकार विलास येडगे, पोकॉ घंटे,वृत्तपत्र विक्रेते भारत यादगिरे यांच्यासह प्रवासी उपस्थित होते.


 
Top