परंडा / प्रतिनिधी : 

येथील रा.गे.शिंदे महाविद्यालयाची गुणवंत विध्यार्थीनी कु.स्नेहल कोकाटे हिने वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सर्वांत जास्त गुण मिळवून सुवर्णपदक मिळवले व सोबतच दोन 1) डॉ.शामराव त्रिंबकराव टिळक पुरस्कार 2) स्व. यमुनाबाई बळवंतराव देशपांडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या २०२१ च्या पदव्युत्तर परीक्षेमध्ये कु स्नेहल कोकाटे हिने हे संपादन केले आहे.स्नेहल कोकाटे हिने पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच हाड जोडीवर राष्ट्रीय स्तरावर वेब ऑफ सायन्स आणि यूजीसी लिस्टमध्ये  संशोधन पेपर ही प्रकाशित केला होता .तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते शाल, बुके व मोमेंटो देऊन महाविद्यालयात भव्य सत्कार करण्यात आला . 

स्नेहल कोकाटे हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या परंडा सारख्या ग्रामीण भागातून एक आदर्श निर्माण केला आहे .विद्यार्थ्यांनी तिची प्रेरणा घेऊन अभ्यास करून महाविद्यालयाचे आपल्या जिल्ह्याचे व विद्यापीठाचे नाव करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी सत्कार समारंभाच्या प्रसंगी अध्यक्ष समोर करताना केले . या सत्कार प्रसंगी व्यासपीठावर वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, डॉ सचिन चव्हाण, आय क्यू ए सी चेअरमन डॉ महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, माजी सभापती सुधाकर कोकाटे आदी उपस्थित होते .यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. प्रास्ताविक करताना वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ प्रकाश सरवदे म्हणाले की स्नेहल कोकाटे ही या महाविद्यालयाची आदर्श आणि सुसंस्कारित विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे तिच्या आई-वडिलांनी तिच्यावर टाकलेला विश्वास तिने सार्थक ठरविला आहे व ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणा निर्माण केली वनस्पती शास्त्रामधील पहिल्याच बॅचमधील पहिलीच विद्यार्थिनी जीने की सुवर्णपदक पटकाविले. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले.


 
Top