परंडा / प्रतिनिधी :-

परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी सुनिता खरसडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट दिली.

 सविस्तर माहिती अशी की, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा शेती पिकांचे नुकसान पाहणी दौरा.दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी परंडा तालुक्यातील सिरसाव, जवळा, राजुरी, आनाळा, वाटेफळ, तांदुळवाडी, कौडगाव, परंडा, आसू अशा गावानुसार करण्यात आला ,परंडा तालुक्यातील सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांनी केली. या वेळी तांदुळवाडी येथील  शेतकरी श्रीमती सुनिता छगन खरसडे यांच्या गट नंबर १३९ मधील १ हे २० आर क्षेत्रावरील सोयाबीन या नुकसान झालेल्या पिकाची बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी चा अहवाल शासनास सादर करण्यात यावा जेणेकरून बाधित झालेल्या झालेल्या पिकातील एकही शेतकरी वंचित राहू नये अशा सूचना दिल्या यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे मॅडम, परंडा तहसीलदार रेणुकादास देवणीकर, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका कृषी अधिकारी रुपनवर साहेब, महापारेषण चे कार्यकारी अभियंता अमेय वनारी , उपअभियंता शेखरसिंग रजपूत, मंडळ कृषी अधिकारी  देवकर , मंडळ कृषी अधिकारी फरतडे ,मंडळ अधिकारी आनाळा योगेश जगताप, सोनारी मंडळ अधिकारी सय्यद, तलाठी किरण शिंदे, ग्रामसेवक किरण यादव, कृषी सहाय्यक  मनोज सूर्यवंशी यांच्यासह, आंबी पोलीस स्टेशनचे पोकॉ. राहुल गायकवाड , तालुक्यातील विविध क्षेत्रातील विविध  विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासह गौतम लटके, मेघराज पाटील, गणेश चव्हाण,सह गावातील माजी सरपंच रावसाहेब खरसडे, बाजीराव दुरुंदे,विजय खरसडे, राहुल देशमुख, अर्जुन खरसडे, बाबुराव बिरंगळ, , रविंद्र हावलदार, गोकुळ खरसडे, गणेश पवार, दिलीप उघडे, भालचंद्र पवार, उमेश जाधव, पंडित खरसडे, सुग्रीव खरसडे, ज्ञानदेव चौधरी, विठ्ठल हावलदार, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब चौधरी, सुरेश हवलदार, विकास चौधरी, हरिभाऊ शेळके, शहाजी शेळके, तन्मय हावलदार आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top