उस्मानाबाद / प्रतिनिधी : 

तुळजापूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ठेकेदाराला तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ व जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनास भिमशक्ती संघटनेच्या वतीने मेसा जानराव यांनी पाठींबा दिला.

   उपोषण आंदोलनात रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे, संघटक सोमनाथ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अस्मिता पारवे, जिल्हा सचिव ज्योती लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, युवक कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बनसोडे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम, कामगार आघाडी अध्यक्ष आप्पा कदम, युवक शहर सचिव आतिश कदम, युवक नेते संतोष बनसोडे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, उस्मानाबाद शहराध्यक्ष उदय बनसोडे, कामगार आघाडी उपाध्यक्ष महादेव सोनवणे, सचिव तानाजी डावरे, युवक उपाध्यक्ष वैजिनाथ पांडागळे, विक्रांत हावळे, चंचल कदम, निशांत कदम, हणमंत सोनवणे, बाबा जानराव, भैरव कदम, हमीद बेग, चोखोबा सिरसट, सुधाकर मस्के, संदीपान कांबळे, बसवंत जाधव, हिरा भालेकर, बाळू डावरे, आनंद कदम, गुणवंत कदम, पंडित भोसले, यांच्यासह रिपाइंचे उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top