उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील येडशी येथे मोबाइल दुकान फोडणाऱ्या दोन चाेरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

येडशी येथील मझहर पटेल यांच्या बस स्थानकासमोरील मोबाइल शॉपीचे शटर तोडून आतील ४ मोबाइलसह ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी सोमवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास लंपास केला होता. ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कळंब उपविभागात गस्तीस असताना त्यांना गोपनीय खबर मिळाली की, अनिल जांभा काळे उर्फ संतोष (रा. पाथर्डी) याच्यासह त्याचा मित्र महादेव राजेंद्र काळे (रा. आंदोरा) दोघे अनेक मोबाईल फोन बाळगून आहेत. यावरून पोलिसांनी त्यांना मंगळवारी सकाळी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, हवालदार जावेद काझी, प्रकाश औताडे, पोलिस नाईक शोकत पठाण, होळकर, मस्के यांच्या पथकाने केली आहे.


 
Top