उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षा दि.21 जुलै 2022 ते दि.12 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे, त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे. तथापि,या वेळापत्रकात तांत्रिक कारणामुळे अंशत: बदल करण्यात आले आहेत,असे मंडळाच्या लातूर येथील विभागीय कार्यालयाने कळविले आहे.

  या वेळापत्रकानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) पुरवणी परीक्षेतील व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर-1 आणि पेपर-2 या विषयांच्या अनुक्रमे दि.06 ऑगस्ट 2022, दि.10 ऑगस्ट 2022 तसेच दि.12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ आणि दुपार सत्रात आयोजित करण्यात आलेल्या विषयाच्या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET) यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेस प्रविष्ठ होत असल्याने दि.06 ऑगस्ट 2022, दि.10 ऑगस्ट 2022 आणि दि.12 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयंच्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.

 वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटक यांनी नोंद घ्यावी. तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि.01 ऑगस्ट 2022 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. असे पुणे येथील महाराष्ट्र राज्याच्या सचिव श्रीमती अनुराधा ओक यांनी  कळविले आहे.

 
Top