तुळजापूर  / प्रतिनिधी-

   साप, पाल,  विंचू एकञित येणारी सावरगाव  येथील  ग्रामदैवत नागनाथ महाराज  यात्रा मंगळवार  (दि.२)रोजी नागपंचमी दिनी हजारो भाविकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडली.

 मंगळवार  पहाटे भक्तांचा दंडवत झाल्यानंतर ,नागनाथ मूर्तीस  महाअभिषेक घालण्यात आला, दुपारी तीन वाजता गावातील प्रमुख मार्गावरून गण ,पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डोके कुटुंबीयांनी बनविलेल्या लिंबाऱ्याच्या पाल्याच्या गोलाकार माळा भक्तांनी परिधान केल्या होत्या. गण,पालखीसमोर पारंपारिक गोफ, टिपऱ्या, लाटीकाटी, म्हसवड येथील सुप्रसिद्ध हलगी वादनाचे सादरीकरण झाले. यावेळी नागनाथ महाराज की जय या घोषाने सावरगाव नगरी दुमदुमली होती, गण पालखी मिरवणूक मंदिर परिसरात आल्यानंतर वर्ष भाकणूक,पारंपारिक नागनाथ साकी, दहीहंडी, महाआरतीने यात्रेची सांगता झाली.

 
Top