उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील जिल्हा कोषागार कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्यविषयक तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. शिबीरामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी अशा एकूण 50 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या

   येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टरांच्या पथकाकडून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या  रक्त शर्करा,  रक्तदाब, लिपीड प्रोफाईल चाचणी आणि किडनी फंक्शन चाचणी आदी स्वरूपाच्या तपासण्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे यांनी दिली आहे.

 

 
Top