उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात चालू शै.वर्षात (२०२२—२०२३) शासनाने एम..एस्सी केमेस्ट्री ,बाॅटनी,झुलाॅजी हे पदव्युत्तर विभाग सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना वरील तीन विषयात एम.एस्सी शिक्षणाची सोय झाली आहे.या अगोदर महाविद्यालयात एम.ए/एम.काॅम च्या शिक्षणाची सोय होती माञ एम.एस्सी.ची सोय नव्हती त्यामुळे उस्मानाबाद जिल्यातील व परिसरातील ज्या विद्यार्थी—विद्यार्थिनींनी एम.एस्सी मध्ये केमेस्ट्री ,बाॅटनी,झुलाॅजी चे शिक्षण घ्यायचे आहे त्यांची सोय झाल्याने परिसरातील विद्यार्थी ,पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या विभागाचे  लवकरच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांचेशी सलग्निकरण होणार असून चालू शै.वर्षात वरील विभागाची प्रवेश प्रक्रिया सूरू होणार आहे.तरी उस्मानाबाद परिसरातील जास्तीत,जास्त विद्यार्थ्यांनी एम.एस्सी.शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

 
Top