उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा दिन  येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उत्साहात साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ स्मिता सरोदे-गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . डी. के. पाटील,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाकाळ , डॉ. सूर्यवंशी, डॉ. सचिन देशमुख,  दंत चिकित्सक डॉ.कठारे, स्त्री रुग्णालय सोलापूरचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. चव्हाण  उपस्थित होते.

  जिल्हा  स्त्री रुग्णालयातील लक्ष्य  कार्यक्रमात उत्कृष्ठ कार्य केलेल्या  सर्व  वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सहकारी यांचा सत्कार   करून त्यांना प्रमाण पत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.  डॉ. कैलास गिलबिले, डॉ. शिंदे, डॉ.सोनटक्के, डॉ. मिनियार, डॉ.बलवंडे, डॉ.मिटकरी, डॉ.टिके, डॉ.आयेशा, डॉ लोणे, परिचारिका मराठे, जगताप,मुंडे यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी रुग्ण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top