उस्मानाबाद /प्रतिनिधी

  14 वा वित्त आयोग व महिला बालविकास योजनेअंतर्गत चौकशी करून कार्यवाही करणे यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅथर सेनेचे ऑल इंडिया पॅथर सेना युवक जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, विजय गायकवाड यांनी जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण केले. दरम्यान आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यामार्फत मुख्यमंंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद यांनी 14 वा वित्त आयोगा अंतर्गत केलेल्या कामाचे 2017 ते 2022 चौकशी करण्यात यावी., ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेगाव ताजी उस्मानाबाद यांनी 2017 ते 2022 या काळात महिला व बालविकास योजनेअंतर्गत लाभार्थ्याची बोगस नावे दाखवून निधी हळप केला आहे याची चौकशी करण्यात यावी., यावर नेमण्यात आलेल्या चौकशी अधिकार्‍यांनी योग्य प्रकारे चौकशी न केल्यामुळे त्याच्यावरही प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी  तसेच उपरोक्त विषयी चौकशीबाबत तीन वेळा अर्ज देण्यात आला पण याकडे अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता  यांनी योग्य प्रकारे लक्ष दिले नाही  तरी उपरोक्त विषयी सर्वांचे चौकशी करून यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


 
Top