वाशी/प्रतिनिधी

अजिंक्य बालक मंदिर येथे बक्षिस वितरण व पालक सभा नुकतीच पार पडली . कार्यक्रमाच्या अध्यक्ष  म्हणून दादासाहेब चेडे, प्रमुख पाहुणे ..प्रवीण कवडे, पो. काँ. सौ. आशा पवार ,सौ.शमलताई कवडे,आणि शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. एस. एल.पवार सर हे होते. 

प्रथम बक्षीस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या नंतर अजिंक्य बालक मंदिरचा पालक शिक्षक संघ निवडण्यात आला त्या मध्ये पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र भीमराव गरड तर उपअधक्ष म्हणून सौ.स्वरूपा सुदर्शन पाटील या आणि सचिव म्हणून सौ. सानिया इम्तियाज तांबोळी यांनी सर्वांमते निवड करण्यात आली. या वेळी पालक राजेंद्र गरड यांनी लहान मुलांनी प्रेमानी सांगा शिकवा नी बोला आसे सुचवले तर पालक दळवे यांनी आपले मनोगत वक्त करताना मुलांना खेळातून शिक्षण द्यावे अश्या प्रकारचे उपक्रम राबवावा असे  सुचवले.त्या नंतर दादासाहेब चेडे यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले आणि शाळेचे संस्थापक श्री. पवार सर यांनी मार्गदर्शन केले त्या नंतर शाळेच्या मुख्ाध्यापक सौ. मनीषा लक्ष्मीकांत पवार यांनी पालकांनी सुचवलेल्या उपक्रमाला लवकरच सुरुवात करू असे आश्वासन दिले  आणि बैठकीची सांगता केली.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. मोळवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.निकम म्याडम यांनी केले तसेच हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top