उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अखंड भारत परिषद च्या वतीने धाराशिव ते संभाजीनगर तिरंगा यात्रेचा कार्यक्रम भगीरथी लाठे विद्यालयात पार पडला


15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तरी आपल्या  निजामग्रस्त मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना मानवी क्षणाचा सामना करावा लागला त्या लढ्याची आठवण तरुणांना असावी व त्या लढ्याचे महत्त्व संपूर्ण देशालाही कळावे यासाठी ही तिरंगा यात्रा येथील देशभक्त तरुणांना सोबत घेऊन काढली जाणार असल्याची माहिती अखंड भारत परिषदेचे अध्यक्ष रत्नाकर गंगाधर केंद्रे यांनी दिली.

कार्यक्रमात नितीन काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला संवादा दरम्यान विद्यार्थ्यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली.आयोजित कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्हाध्यक्ष धाराशिव नितीन काळे, भगिरीथी लाटे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग लाटे, शेषेराव उंबरे, ओम नाईकवाडी, प्रीतम मुंडे, सुनील पंगुडवाले, रोहित देशमुख,सुरज सगरे, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग उपस्थित होता

 
Top