तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पारंपरिक पध्दतीने धार्मिक  वातावरण मोठ्या उत्हासात पार पडला.

गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने येथील श्रीमुदगुलेश्वर शंभुमहादेव  व श्री विठ्ठल-रुक्मणी मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा आकर्षक असा गाभाऱ्यात आरास साकारला होता.

श्रीमुदगुलेश्वर मंदीरात श्रीशंभुमहादेव पिंडीस श्रीकृष्णाचे रुप दिले होते तर संपुर्ण गाभाऱ्यात नयनरम्य देखावा मांडला होता. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने दर्शनार्थ आलेला भाविक हा नयनरम्य आकर्षक देखावा पाहुन हरखुन जात होता. तर शहरातील कासार गल्लीतील श्रीविठ्ठल-रखुमाई मंदीरात श्रीविठ्ठल मुर्तीस श्रीकृष्णरुप देण्यात आले होते. 

येथील जय हनुमान मंदीरात राञी बारा बाजता हजारो महिलांचा उपस्थितीत सजीव देखाव्यासह श्रीकृष्ण जन्म सोहळा संपन्न झाला तर शुक्रवार रोजी  गोपाळकाला नंतर   दहीहंडी सोहळा होवुन श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची सांगता झाली

 
Top