उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

लोकसेवा मंडळातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक, रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका व रुग्णांनी एकमेकांना राख्या बांधल्या. 

 आरोग्य कर्मचारी सर्वांना देत असलेली अविरत सेवा व कोविड काळात स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जीवाची बाजी लावून केलेली रुग्णसेवा याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकसेवा मंडळामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास डॉ. शशिकांत चिंतामणी  यांनी केले.   प्रास्ताविक अ‍ॅड विक्रम साळुंके यांनी केले.  या कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील सर, डॉ. राठोड सर ,  सुमित्रा गोरे  , डॉ. शतानंद दहीटणकर  यांच्यासह लोकसेवा मंडळातर्फे  सतीश राजेनिंबाळकर, मुकुंदजी भातंब्रेकर, शुभम स्वामी,  वासुदेव वेदपाठक,  कमलाकर नागटिळक, बाळासाहेब देशमुख,  रताप मायभाटे,  जयराज माळाळे,  प्रदीप मोकाशी,  यशोदीप कदम, ॲड विक्रम साळुंके, डॉ. शशिकांत चिंतामणी  यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेऊन हा उत्सव उत्साहात पार पाडला.


 
Top