उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नूतन प्राथमिक विद्यामंदीर  येथे तिरंग्याच्या रंगाचे फुगे आकाशात सोडून  “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी “ वर्षाच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. प्रारंभी प्रशालेच्या संस्कृतिक विभागातर्फे प्रशालेत  सकाळी 7:10 वाजता झेंडावंदन घेण्यात आले. या प्रसंगी छोट्याश्या चिमुकल्यांची 151 तिरंगा झेंड्या सहीत मानवी साखळी तयार करण्यात आली होती , प्रशालेतील मुला-मुलींनी तिरंगी  रंगाचे  फुगे आकाशामध्ये सोडून भारत माता की जय या घोषणा देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात केली.

याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या  सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील  , संस्था सदस्य डॉ विठ्ठलराव पडवळ , शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदिपकुमार गोरे  ,पालक प्रतिनिधी श्री. होळकर साहेब ,  संतोष माळी, . संजय जाधव ,  रामराजे पाटील ,सांस्कृतिक  विभाग प्रमुख   प्रविण गोरे,   शितल देशमुख, दिपाली राऊत , अपर्णा देशमुख ,  झाडे मॅडम, संध्या मुंडे , शिवराज खोबरे,  अनुप जाधव,  सुरज सपाटे यांच्यासह  शाळेतील कर्मचारी ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top