उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 6 मधील महिलांनी तिरंगा रॅली काढून केला आनंदोत्सव साजरा केला.

 भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आणि त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 6 मधील महिलांनी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे यांच्या पुढाकाराने तिरंगा रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग  घेतला. “भारत माता की जय” ,”वंदे मातरम्”,या घोषणा देत तिरंगा रॅलीची सुरुवात बोंबले हनुमान चौकातुन करुन, रॅलीची सांगता जिजाऊ चौकात पुष्पहार घालुन राष्ट्रगीताने झाली.


 
Top