उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्यावतीने “आजादी का अमृत महोत्सव” यानिमित्ताने स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून आजतागायत आपल्या भारतीय संस्कृती, रूढी, परंपरा, सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता टिकविणे ,वाढविणे, प्रबोधन करणे, जन जागृती करण्याचे कार्य मंडळांनी रंगमंचकावरून श्री च्या समोर विविध हलते देखावे दाखवून मंडळाचे कलाकार व मूर्तिकार निस्वार्थ वृत्तीने आपली सेवा देणारे ,गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले, व्हाॅलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू ,काशिनाथ दिवटे व त्यांचे सहकारी यांनी गेली 58 वर्षापासून कार्य करीत आहेत.  

1969 मध्ये भारत माता व इतर स्वातंत्र्यसेनानी दाखवून राष्ट्रभावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 1970 मध्ये जय हिंद- वंदे मातरम गीतावर देखावा, 1988 मध्ये सर्वधर्मसमभाव एका नौकेतून प्रवास करीत असलेले विविध जाती धर्माचे बसलेले  नागरिक दाखविले होते ,1997 स्वातंऱ्याच्या 50 वर्षाच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्वातंत्र्यवीर  यांच्या मूर्तीतून देखावा,    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक देखावे  स्त्रियांचा सन्मान, अन्याय अत्याचारी व्यक्तीस शिक्षा, विविध जाती-धर्माचे शूर सरदार आदर्श अष्टप्रधान इत्यादी स्वातंत्र्याच्या व राष्ट्रीय एकात्मतेच्या देखावे सादर केले.  तीन दिवस प्रभागात हर घर तिरंगा याबाबत घरोघर जाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याविषयी कार्य केले. मंडळाने मंदिरावर तिरंगा छोटे झेंडे व एक उंच व मोठा झेंडा लावून भारत माता की जय ,जय हिंद, वंदे मातरम इत्यादी घोषणाने लेझीम खेळातून व हलगी ढोल ताशा यांच्या आवाजातून , घोषणाने आकाश दुमदुमून टाकले होते .अत्यंत उत्साही वातावरणात भव्य व मोठे पोस्टर तयार करून पोस्टर मध्ये “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताॅ  हमारा “ भारताचा नकाशा व नकाशा मध्ये राष्ट्रध्वज घेऊन उभे असलेली भारत माता, नकाशा भोवती विविध जाती धर्माचे बोधचिन्ह दाखवून, विविध जाती धर्माची जोडपी आम्ही सुखाने नांदत आहोत. भारताच्या संविधानानुसार स्वातंत्र्य - समता- बंधुता  या मूल्यांना महत्त्व देऊन, “ हिंद देश के सभी जन एक है , रंग, रूप ,वेष, भाषा चाहे अनेक है .या ओळी लिहून राष्ट्रभक्ती व 75 वर्षाचा भारतीय वैभवशाली मानवतेचा इतिहास जागा झाला, पोस्टरमध्ये नुकत्याच बरमिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 61 पदक मिळविणाऱ्या खेळाडूंचा समूह छायाचित्र दाखवून, भारतास चौथे स्थान मिळवून दिले, या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. कोरोना योद्धे, सीमेवरील जवान, शेतकरी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सेवक इत्यादी चे छायाचित्र दाखवून त्यांचे कोरोना काळातील निस्वार्थ सेवेस सलाम केले आहे. मंडळाचे हे पोस्टर अत्यंत आकर्षक, प्रबोधनात्मक, जनजागृती राष्ट्रीय एकात्मता इत्यादी दाखवून, भारत  महा प्रजासत्ताक राष्ट्र आहे.

हे सर्व यशस्वी करण्यासाठी सतत तीन दिवस राजकुमार दिवटे, संजय पाळणे, विश्वास दळवी, दुर्गेश दिवटे ,विद्यानंद साखरे, आप्पा खरबरे, मनोज  अंजीखाने, दत्ता वाडकर, मिलिंद वैद्य ,सागर पाळणे ,वरून साळुंखे, बेद्रे बंधू, तीर्थकर बंधू, दिवटे बंधू, पाळणे बंधू ,मेत्रे बंधू ,देशमाने बंधू , चवंडकेबंधू, गणेश जगदाळे बंधू ,अतुल ढोकर, अक्षय ढोकर, रणजीत बुरुंग, मुझे मिल पठाण, हवेली, कल्याण गवळी इत्यादींनी प्रा. गजानन गवळी, डॉ. अजित नायगावकर, विष्णुदास सारडा, मनमतआप्पा पाळणे यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत उत्साही व आनंदीमय वातावरण जल्लोषात जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, या घोषणा ने फटाक्याच्या व शोभेच्या दारु च्या आतशबाजीने अमृत महोत्सव साजरा केला. मंडळाचे संयोजक प्रा. भालचंद्र हुच्चे यांनी सांगितले.

 
Top