उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री कालिका देवी देवस्थान समिती व कालिकादेवी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच श्री.संत नरहरी महाराज मंदिरात

पार पडला .

सोबतच सोनार समाजातील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कवयित्री रेखा ढगे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्वतःतील उपजत गुणांना वाव द्या तसेच आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हा.

निश्चित ध्येय प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी, सोबत कष्टाची तयारी ठेवा परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करा जिद्द व चिकाटी यासोबत प्रामाणिकपणा असेल तर यश नक्की मिळते असे त्या म्हणाल्या. वर्तमानपत्रासोबत इतरही वाचनाची आवड लावून घ्या .

याप्रसंगी नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या मणीकर्णिका गोपाळ म्हेत्रे व तिच्या पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले.शिवाय बाल कुस्तीपटू शिवराय ओंकार नायगांवकर याचाही सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रेखा पोतदार यांनी केले.

सूत्रसंचालन दिपाली पंडित व प्रास्ताविक वैशाली पंडित यांनी तर आभार नंदा नायगावकर यांनी मानले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत वैरागकर महिला मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी नायगांवकर,व कालिकादेवी देवस्थान समितीच्या सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.यावेळी गुणवंत विद्यार्थी पालक व समाज बांधव उपस्थित होते.


 
Top