मुरुम/ प्रतिनिधी-

 अस्मिता विश्वस्त मंडळ संचलित इंद्रधनू वृध्द सेवा केंद्रात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काॅम्रेड विठ्ठल सगर लोकप्रबोधन मंच कडून इंद्रधनू वृध्द सेवा केंद्राला अकरा हजार रूपये देणगी. अस्मिता विश्वस्त मंडळ संचलित इंद्रधनू वृध्द सेवा केंद्रात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव श्रीमती शरयू जोशी निवृत्त मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहन करून साजरा करण्यात आला. 

यावेळी आयोजित कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक डाॅ.दामोदर पतंगे म्हणाले देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. कित्येक क्रांतीकारानीं जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज घरोघरी जेष्ठांचे स्वातंत्र हिरावले जात आहे. पण इंद्रधनू वृध्द सेवा केंद्रात जेष्ठांना मुक्त वातावरण असल्याने पूर्ण स्वातंत्र आहे. त्यामुळे ते सुखासमाधानाने उर्वरित जीवन आनंदात घालवत आहेत. या प्रसंगी  प्रा. किरण सगर यांनी इंद्रधनू वृध्द सेवा केंद्राला काॅम्रेड विठ्ठल सगर लोकप्रबोधन मंच उमरगा च्या वतीने अकरा हजार रुपये देणगी दिली तसेच निवासी जेष्ठांना मिष्टान्न भोजन देत सगर कुटुंबियांनी सोबत सहभोजन घेत वृध्दांसोबतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आगळा वेगळा पध्दतीने साजरा केला.सर्व वृध्दांना डायऱ्या भेट म्हणून देण्यात आल्या.यावेळी प्रा. किरण सगर, प्रा. अवंती सगर, सेवानिवृत्त परिचारिका सविता सगर, पाशाभाई कोतवाल, अस्मिता विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष डाॅ. सागर पतंगे, सदस्य प्रा. रत्नाकर पतंगे, निशांत नाजरे उपस्थित होते. सचिव प्रा. अभकुमार हिरास यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मारुती खमितकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.  चौरस्ता, ता. उमरगा येथील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम प्रसंगी बोलताना अस्मिता विश्वस्त मंडळ अध्यक्ष डॉ. दामोदर पतंगे , मंचावर डावीकडून पाशाभाई कोतवाल, प्रा. अवंती सगर, श्रीमती सविता सगर आदी. 


 
Top