उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यासह बार्शी, औसा व निलंगा तालुक्यातील अतिवृष्टी, गोगलगायचा प्रादुर्भाव व यलाे माेझॅक रोगामुळे सोयाबीन व इतर पिकांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना केंद्राने भरीव मदत करावी, अशी मागणी शुन्य प्रहरात केल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

ते म्हणाले, खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला शंखी गोगलगाय या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होवून पिक शंखी गोगलगायींनी खाल्ल्याने जवळपास २६१०.१८ हेक्टर सोयाबीन पिकाचे क्षेत्र उध्दवस्त झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांना शंखी गोगलगायींचा बदोबस्त करण्यासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा लागला.यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन संपुर्णत: कोलमडले. मागील काही दिवसांत अतिवृष्टीसदृश्य सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस होत असून पाडोळी, जागजी व जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली.त्यामुळे नुकसान झालेल्या अशा शेतकऱ्यांना मदतीची मागणी लोकसभेत करण्यात आली.


 
Top