उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त  शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा   घेण्यात आल्या होत्या ,या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या हस्ते झाले.

 वक्तृत्व कला अवगत असलेला विद्यार्थी जीवनात हमखास यशस्वी होतो.मी सुद्धा शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धांमधे भाग घ्यायचो व अनेकदा मिळालेल्या बक्षिसांमधून शालेयउपयोगी साहित्य खरेदी करायचो.अभ्यासामुळे व वक्तृत्व कलेमुळेच मी आज या पदापर्यंत पोहंचू शकलो असे मत  प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी उद्घाटनप्रसंगी मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य प्रा.पंडित पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उप प्राचार्य डॉ. सतीश लोमटे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे प्रा.सुशील शेळके यांनी केले.महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना विचारपीठ उपलब्ध करुन दिले तर त्याचा फायदा भविष्यात त्यांना जीवन जगत असताना  प्रत्येकच क्षेत्रात होत असतो म्हणून विद्यार्थ्यांनी वाचन वाढवून,अभ्यासपूर्ण भाषण केले पाहिजे व ते करताना हातवारे व श्रोत्यांवर प्रभाव सुद्धा पाडता आला पाहिजे आणी याच गुणांना विकसित करण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे मत प्रा.सुशील शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मांडले.

या स्पर्धेमध्ये तब्बल 34 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी आकाश बारस्कर,पायल घाडगे व सुरवसे योगिता या  विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा.गणेश पाटील,प्रा.गायकवाड सर,प्रा.गोविंद काकडे,प्रा.सुनील भिसे,यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.विलास अडसूळ , प्रा. मिटकरी सर,प्रा.भोसले सर,प्रा.ओमन सर,प्रा.मोरे सर,प्रा.टेकाळे सर,प्रा.गंभीरे सर,प्रा.बारकूल सर, प्रा.शिंदे सर , प्रा.आडे सर,प्रा. राऊत सर,प्रा.खंडागळे सर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.काझी सर तर आभार प्रदर्शन प्रा.काशिनाथ हंडीबाग यांनी केले.

 
Top