लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात जोरदार पावसामुळे पाण्याचा ओघ झपाट्याने वाढत असल्याने दि.31 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 10:30 वाजता 4 दरवाजे 0.10 मिटर उंचीने उघडण्यात असून तेरणा नदीपात्रात 43.328 घमी/सेकंदने (1530.11 घनफूट/सेकंद) विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  नदिकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुर्ण क्षमतेनी भरला असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.


 
Top