तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजाभवानी मातेच्या पालखीची दांडी रविवारी (दि.२८) बुऱ्हाणनगर येथून राहुरीकडे पाठवण्यात आली. तत्पूर्वी बुऱ्हाणनगर येथे पालखीच्या मानकऱ्यांकडून दांडीची विधीवत पूजा, महाआरती करण्यात आली. प्रथेप्रमाणे राहुरी येथील सुतार व लोहार पालखीचा पाळणा तयार करतील व ४ सप्टेंबरला तयार पालखीचे बुऱ्हाणनगर येथे आगमन होईल. तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवात सीमोल्लंघन सोहळ्यात बुऱ्हाणनगर पालखीचा मान आहे.

तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून सीमोल्लंघन सोहळ्यातील पालखीच्या मानकऱ्यांनी पालखीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभर बुऱ्हाणनगर येथे असणारी पालखीची दांडी रविवारी राहुरीकडे प्रथेप्रमाणे रवाना करण्यात आली. यावेळी सागर भगत, ज्ञानेश्वर भगत, शिवराम भगत, संदीप भगत, देविदास भगत, मंगेश भगत, निलेश भगत, सुरेंद्र भगत, दीपक भगत आदी पालखीच्या मानकऱ्यांनी विधीवत पूजन केले. यावेळी पुजारी, मानकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top