लोहारा/प्रतिनिधी

छत्रपती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर तालुकास्तरीय कामगार मेळाव्याचे आयोजन उमरगा येथील पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तानाजी गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फकिरा दल चें सतीश कसबे,कामगार संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी माटे,दत्तात्रय शेवाळे, शिवव्याख्याते गोपाळ माने,उमरगा तालुका महिलाध्यक्ष शामल ढोणे, लोहारा महिलाध्यक्ष बबिता रनखांब,संघर्ष महिला बचतगट चें अध्यक्ष वर्षा कांबळे  आदी उपस्थित होते.

  यावेळी कामगारांच्या अडीअडचणी समजून घेऊन ,कामगार ऑनलाईन नोंदणी व ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्रासंदर्भात चर्चा करून,तसेच मध्यान भोजन योजने संदर्भात अडचणीवर मात करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.तसेच सतीश कसबे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर कामगारांना मार्गदर्शन केले.तसेच शिव व्याख्याते गोपाळ माने यांनी  कामगारांना सविस्तर मार्गदर्शन केले.तर संयोजक म्हणून निकिता गायकवाड यांनी व सूत्रसंचालन शुभम गायकवाड यांनी केले .तर आभार बालाजी माटे यांनी मानले.


 
Top