उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  अदिवासी समाजातून नामदेवराव सारखे समाजसेवी रत्न महाराष्ट्राला दिले, अशा आदर्श माता मुळे देशाचे नाव उंचावले,असे प्रतिपादन जिला पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.   

आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, भास्कर भोसले  यांची आदर्श माता आई शेवराई यांनी नागपुर  यवतमाळ व उस्मानाबाद जिल्हयातील आदिवासी पाड्यावर व पोलीस अधिक्षक कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.  यावेळी  यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  डॉ. दिलीप पाटील भुजळ , उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक .नवनीत कावत   आदींची उपस्थिती होती. 

 देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त आई शेवराईला यवतमाळ  व उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वातंत्र्याचा 75 वा.  वर्धापन दिनी आपल्या खुर्चीवर बसवून सन्मानित केले.  व उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत 10 हजार वृक्षारोपण करुन स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

या वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले. साहित्यिक, भास्कर भोसले, ॠतुजाराणी भोसले यांची उपस्थिती होती. 


 
Top