लोहारा/प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावर नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी  पुढाकार घेऊन तिरंगा ध्वज फडकिवला.

हर घर तिरंगा या अभियानाची लोहारा नगरपंचायकडून शहरात  मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली होती.त्यात लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावर तिरंगा ध्वज फडकावा यासाठी नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी पुढाकार घेवून स्वस्त: पालावर जाऊन तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. या ठिकाणी अकर्षक रांगोळी ही काढण्यात आली होती.या भजक्या विमुक्त लोकांसाठी अल्पउपहारांची व्यवस्था करण्यात आली होते.यावेळी तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बिराजदार,नगरसेविका मयुरी बिराजदार, डॉ.हेमंत श्रीगिरे,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे,जनकल्याण समितीचे पुर्ण वेळ कार्यकर्ते शंकर जाधव,माजी  ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी,रघुवीर घोडके,चिदानंद स्वामी, राजकुमार स्वामी, उत्तम पाटील, बलू स्वामी,किरण पाटील,कमलाकर मुळे,प्रेम लांडगे,प्रशांत थोरात यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


 
Top