उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विदर्भात बोंडअळीचे पॅकेज ज्या पध्दतीने जाहीर केले तसेच गोगलगाय व यलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्यांना विशेष पॅकेज अंतर्गत मदत करावी , अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व कृिषमंत्री यांच्याकडे केली आहे. 

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील धाराशिव जिल्ह्यासह बार्शी, औसा व निलंगा तालुक्यात मागील काही दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगाम २०२२ मधील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, उडीद, मुग, तुर पीकांवर शंखी गोगलगाय व इतर कृमीजन्य कीडींचा तसेच यलो मोझॅक या विषाणुजण्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे.

   विदर्भामध्ये गुलाबी बोंडअळी आणि धान पिकांवरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे विशेष पॅकेज जाहीर करुन मदत केली होती त्याच धर्तीवर जिल्ह्यातील शंखी गोगलगाय व इतर कृमीजन्य कीडींचा तसेच यलो मोझॅक या विषाणुजण्य रोगांमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांना विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पत्राद्वारे केली.


 
Top