नळदुर्ग  / प्रतिनिधी-

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नळदुर्ग शहरात नगरपालिकेच्यावतीने १५ मुख्य ठिकाणी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहर आता ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगरानीखाली आले आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे टवाळखोरी,गुंडगिरी चोऱ्या, छेडछाडीच्या घटना दोन अवैध धंदे यांना आळा बसणार आहे. शहरवासियांनी न.प.च्या या कामाचे कौतुक केले आहे.

 कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे नळदुर्ग शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.नुकताच या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा झाला आहे. या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण पोलिस ठाण्यात राहणार आहे.   शहरातील किल्ला गेट दर्गाह चौक, क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक, अहिल्याबाई होळकर चौक, वेस, नवीपेठ मार्केट, अक्कलकोट रोड, बसस्टँड एन्ट्री कॉर्नर, बसस्टँड एक्झिट, झेडपी शाळा चौक, नानीमा  चौक, हुसेन चौक व कॉलेज रोड याठिकाणी अतीशय उत्तम चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.या तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील मुख्य भाग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आला आहे.


 
Top