उस्मानाबाद ( प्रतिनिधी) राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उस्मानाबाद येथील दिवंगत शिवसैनिक कै दिलीप जावळे यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्विकारले असून त्यांच्या कुटुंबातील मुला-मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

निष्ठावंत शिवसैनिक तथा माजी उस्मानाबाद तालुकाप्रमुख स्व. दिलीप जावळे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उस्मानाबाद येथे स्व. जावळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची मंत्री सावंत यांनी सांत्वनपर भेट घेऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तसेच भविष्यात देखील काहीही अडचण आली तर मी भाऊ म्हणून तुमच्यासाठी हजर असेल असा विश्वास दिला. यावेळी धनंजय सावंत, दत्त साळुंखे, सुरज साळुंखे, धनंजय रणदिवे आदी उपस्थित होते.

 
Top