उस्मानाबाद / प्रतिनिधी

 मौजे देवकुरुळी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद येथील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.उस्मानाबाद या जागरी पावडर (गुळ पावडर) कारखान्याचा रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

मागील चाचणी हंगामात ६१००० टन उस गाळप करून १५ दिवसात उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मागील वर्षी चाचणी हंगाम असल्याने व ऊस वाहतुकीची यंत्रणा अपुरी असल्याने अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले, परंतु यावर्षी कारखाना व्यवस्थापनाने १४० वाहनांचा करार केला असल्याने यावर्षी १५०००० टन पेक्षा जास्त उसाचे गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा मनोदय आहे. येत्या ऑक्टोबर मध्ये कारखाना पहिला गाळप हंगाम सुरू करेल. यामुळे परिसरातील उसाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. याप्रसंगी संचालक दिनेश कुलकर्णी, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे अध्यक्ष बालाजी कोरे, संचालक सचिन मिनीयार, ॲड.नितीन भोसले, ॲड.प्रतीक देवळे, कारखान्याचे एम.डी गणेश कामटे, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जाधव, शेतकी अधिकारी धनंजय गुंड, चीफ इंजिनियर हरी सिरसाठ, भारतीय जनता पार्टीचे धाराशिव शहराध्यक्ष राहुल काकडे, देवकुरुळीचे सरपंच हनुमंत जाधव, सुजित साळुंके, अरविंद गोरे, व्यंकटेश दिवाने, मंगेश कुलकर्णी, मझहर शेख, अक्षय शेळके व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतिक देवळे यांनी केले तर आभार दिनेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

 
Top